राजुरा तालुक्यात डिजिटल मीडियाला नवी दिशा;संतोष मेश्राम तालुका अध्यक्ष तर राकेश कलेगुरवार सचिवपदी नियुक्त.
राजुरा तालुक्यात डिजिटल मीडियाला नवी दिशा; संतोष मेश्राम तालुका अध्यक्ष तर राकेश कलेगुरवार सचिवपदी नियुक्त. राजुरा:- ( ओंकार आस्वले) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ चंद्रपूर यांच्या वतीने डिजिटल माध्यमातील संघटनात्मक कार्य अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने दि. १४ मार्च रोजी महत्त्वपूर्ण नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार संतोष मेश्राम यांची डिजिटल मीडिया राजुरा तालुका अध्यक्ष म्हणून तर राकेश कलेगुरवार यांची डिजिटल मीडिया सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष ॲड. राहुल थोरात यांच्या हस्ते अधिकृतपणे जाहीर करण्यात आली. राज्य उपाध्यक्ष प्रा. महेश पानसे, जिल्हाध्यक्ष शंकर बोरघरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन संघटनेने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे. नियुक्तीनंतर संतोष मेश्राम व राकेश कलेगुरवार यांनी संघटनेचे कार्य अधिक गतिमान करण्याचा, पत्रकारांच्या प्रश्नांना डिजिटल माध्यमातून प...